मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट उदयनगर येथील अष्टमी प्रहार नाम कीर्तनला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थिती दर्शवून आशीर्वाद घेतले.यावेळी रामेश्वर बाबा आत्राम,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठीर बिश्वास मनमत रॉय,अलोक रॉय,निर्मल मिस्त्री,नित्यरंजन रॉय,आणि कमिटीचे सदस्य उपस्थित होते
6 ते 8 मार्च पर्यंत उदयनगर येथे अष्टमी प्रहार नामकीर्तन आयोजीत करण्यात आले होते.आज शेवटच्या दिवशी महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला भाग्यश्री ताई आत्राम यांनी उदयनगर येथे भेट देऊन विविध कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतले.
यावेळी ताईंनी उपस्थित गावकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करत समस्या जाणून घेतले. गावकऱ्यांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झाल्याने उदयनगर गावातील कमिटीतर्फे ताईंचे स्वागत करून आभार मानले.यावेळी परिसरातील नागरिक व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.