मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आलापल्ली:- येथील श्रीराम चौक येथील गोटूल समाजमंदिर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने होळी दहन करण्यात आले.
हिंदू धर्मातील महत्वाचा सण म्हणून होळी सणाला ओळखतात. सत्याचा असत्याचा विजय, वाईटावर चांगलेपणा विजय हे या सणाचे प्रतीक आहे.
यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम सह परिवार सोबत होता तसेच आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती रमेशजी मडावी सह वार्डातील व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.