✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. यामुळे पोलीस प्रशासन आणि संपूर्ण हिंगणघाट शहरात एकच खळबळ माजली आहे. हिंगणघाट शहर पोलिस स्टेशन येथे कार्यरत तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्यावर एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचा आरोप करत तक्रार दाखल केली.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार एका २४ वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ केल्याच्या कारणावरून येथील ठाणेदार संपत चव्हाण याच्याविरुद्ध गुन्ह्याची तक्रार दाखल झालेली आहे.सविस्तर वृत्त असे की सदर युवती ही ५ ऑगस्ट २०२१ ला आपल्या कुटुंबाविरुद्धची तक्रार घेऊन हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये आली होती. त्यावेळी ठाणेदार संपत चव्हाण हे कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांनी तू माझ्याशी मैत्री करशील तरच मी तुझी तक्रार घेईल, असे तिला सांगितले. यानंतर पोलीस निरीक्षक संपत चव्हाण हे तिच्या घरीही जाऊन आले त्यावेळी ती घरी एकटीच होती. शारीरिक संबंध ठेवले तरच मी तुझी तक्रार घेईल असे म्हणत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान त्यांनी एक व्हिडिओ काढून त्या व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. ठाणेदार एप्रिल २०२२ पर्यंत सदर तरुणीसोबत शारीरिक संबंध करीत राहिले. तिच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली. दरम्यान या प्रकरणामुळे ठाणेदार चव्हाण यांची तात्पुरती वर्धा बदली करण्यात आली.
त्यांच्याजागेवर ठाणेदार कैलास फुंडकर यांना प्रभारी पदभार देण्यात आला. २१ डिसेंबर २०२२ ला सदर तरुणीने ठाणेदार चव्हाण विरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांविरुद्ध तक्रार असल्याने तुझी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात येईल. असे या तरुणीला सांगण्यात आले.सदर तरुणीने पोलीस अधीक्षकांकडे ईमेलद्वारे ही तक्रार दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी निरीक्षक संपत चव्हाण यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केलेली आहे..