माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून श्री श्री राधाकृष्ण भजन मंदिराला आर्थिक देणगी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उदयनगर येथील अष्टमी प्रहार नाम कीर्तन कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते, माजी आमदार व आविसचे विभागीय अध्यक्ष दिपक दादा आत्राम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसंवेत उपस्थिती दर्शवून आशीर्वाद घेतले. दर्शन घेतांना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचेसोबत वेलगूरचे उपसरपंच उमेशभाऊ मोहूर्ले, मंडळाचे अध्यक्ष नारायण मंडल, सचिव वासुदेव मंडल, संजय मंडल, हर्षीत राय, सुजय मंडल, मिथुन राय,सुजित मिस्त्री,प्रदीप मंडल, नारायण तरफदार, खितिष बाला,संतोष साध्य, मनोज मिस्त्री, राजेश बाला, अर्जुन मंडल,जुलेख शेख,विनोद कावेरी सह कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
उदयनगर येथील अष्टमी प्रहार नामकीर्तन मंदीरात मंडळाकडून सलग तीन दिवसाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उदयनगर येथे भेट देऊन विविध कार्यक्रमात कार्यकर्त्यांसंमवेत प्रत्यक्ष सहभाग घेतले.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित नागरिकांसोबत विविध विषयांवर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतले. उदयनगर येथील गावकऱ्यांच्या निमंत्रणाला मान देऊन या कार्यक्रमाला न चुकता उपस्थिती दर्शविल्यानं उदयनगर गावातील कमिटीतर्फे माजी आमदार आत्राम स्वागत करून आभार मानले.यावेळी परिसरातील नागरिक व महिला मंडळ व आविसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.