मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दि. 08 मार्च:- रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पोमके मरपल्ली येथे श्री.निलोत्पल पोलीस अधिक्षक गडचिरोली, श्री.अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान), श्री. कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. यतीन देशमुख अपर पोलीस अधीक्षक प्राणहिता, यांचे संकल्पनेतून व श्री. सुजीतकुमार क्षीरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या अंतर्गत भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला.
सदर महीला मेळावास श्रीमती डॉ. लीना पाटील मॅडम, वैदयकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मरपल्ली, श्रीमती शोभा रेणकुंटलवार, अंगणवाडी सेविका मरपल्ली, सौ. जयश्री शेरेकार अंगणवाडी सेविका करंचा, सौ. वंदना कोंडागुर्ले अंगणवाडी सेविका मरपल्ली टोला, सौ. सुनंदा आत्राम ग्रामपंचायत सदस्य मरपल्ली, वनिता पोरतेट आशा सेविका मरपल्ली, अमॄता गेडाम आशा सेविका भस्वापूर, प्रेमिला वेलादी आशा सेविका, तुळसी कुलमेधे आशा सेविका, सौ. निशा दुर्गे मरपल्ली, म. पोलीस अंमलदार वंदना कोडपा, म. पो. अंमलदार कविता तलांडी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती.
सदर मेळाव्या दरम्यान सर्व प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला दीप प्रज्वलन करून पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमात सौ. निशा दुर्गे यांनी उपस्थित महीला मार्गदर्शन केले… व स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून दिले. पोमके मरपल्ली हद्दीतील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉ. पाटील मॅडम, सौ. निशा दुर्गे मॅडम, सुनंदा आत्राम ग्रा. प. सदस्य तसेच उपस्थित सर्व अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांचा श्रीफळ साडी देवून सत्कार करण्यात आला.
या मेळाव्या दरम्यान..
1) उज्वला गॅस योजना अंतर्गत नवीन गॅस वाटप – 05 2) साडी वाटप – 30 3) ब्लाऊज वाटप – 50 4) आधार कार्ड नवीन – 08 5) आधार कार्ड अपडेट – 23 सदर कार्यक्रमादरम्यान प्रभारी अधिकारी पोउपनि. संतोष जायभाये पोमके मरपल्ली यांनी महीला संबंधीचे कायदे तसेच विविध शासकीय योजना याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन म. पो. अंमलदार शारदा मडावी यांनी केले… सदर कार्यक्रमास पोमके मरपल्ली हद्दीतील 125 ते 150 महीला, लहान मुली उपस्थित होत्या.. उपस्थित सर्व महिलांना फराळ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर महीला मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पोउपनि. प्रविण सोनवणे व सर्व जिल्हा पोलीस अंमलदार, पोनि. तल्लूर सा. रा. रा. पोलीस बल गट 1 पुणे व त्यांचे सर्व अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले.