ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- तालुक्यातील पिंपळगाव परिसर पत्रकार संघ दरवर्षी समाज उपयोगी कार्यक्रम राबवित असतात. या वर्षी देखील आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल योगिता चौधरी यांचा महिला दिनानिमित्त सत्कार व सन्मान करण्यात आला. तसेच येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र वाघमारे यांच्या पत्नी सुनीता वाघमारे यादेखील पिंपळगाव येथे शाळकरी मुलांच्या शिकवनी कोणतीही फी न घेता विनामूल्य शिकवतात त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत पत्रकार संघातर्फे त्यांचा सुद्धा सत्कार व सन्मान करण्यात आला. या दोघ महिलांना संघातर्फे शाल, श्रीफळ, साडी व महिला शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांची फोटो प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी सत्कारार्थी महिला पोलीस योगिता चौधरी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की पुरुषांनी महिलांचा वेळोवेळी सन्मान करायला हवा, आमच्याकडे दररोज चार ते पाच महिलांच्या तक्रारी येत असतात याची देखील एक महिला म्हणून खंत वाटते असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र वाघमारे, साहाय्यक निरीक्षक अमोल पवार व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपळगाव पत्रकार संघाचे पत्रकार दिलीप जैन, भिकन पाटील, रवी पांडे, सुनील लोहार, हेमशंकर तिवारी, संदीप सराफ, किशोर लोहार, दीपक मुलमुले, राकेश सुतार, चंद्रकांत माहोर, दीपक लाधे, ईसा तडवी व विनोद काटे यांनी परिश्रम घेतले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348