पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे शहरात घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत वरिष्ठांकडुन प्राप्त झालेल्या आदेशाप्रमाणे दिनांक ०८/०३/२०२३ रोजी युनिट-२ प्रभारी अधिकारी, क्रांतीकुमार पाटील यांचे आदेशान्वये युनिट-२ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे समांतर तपास करीत असताना, पोलीस अमलदार समीर पटेल व कादीर शेख यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे १. युवराजसिंग गुरुबच्चनसिंग कल्याणी, वय १८, रा. रामटेकडी हडपसर, पुणे २. विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवून, त्यांचेकडुन १,८५,०००/- रु किया मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपीतांकडुन एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
(१) लष्कर पोलीस स्टेशन गुरनं ५५ / २०२३ भादवि क ४५४, ४५७,३८०
२) लष्कर पोलीस स्टेशन गुरनं २८ / २०२३ भादविक ४५४, ४५७, ३८०
३) वानवडी पोलीस स्टेशन गुरनं १४५ / २०२३ भादवि क ३७९
(४)स्वारगेट पोलीस स्टेशन गुरनं १४५ / २०२१ भादवि क ३७९
वरील आ.क्र.१ व २ हे रेकॉर्डवरील असुन त्यांची वैदयकिय तपासणी करुन पुढील कारवाई करीता लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचा अधिक तपास लष्कर पोलीस स्टेशन येथे आहे..
सदरची कामगिरी उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पो. आयुक्त गुन्हे- १. श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट -२, पुणे, सहा. पो. निरी वैशाली भोसले, पो.उप निरी. नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे, पोलीस अमलंदार. कादीर शेख, समिर पटेल, पुष्पेंद्र चव्हाण, गजानन सोनुने, विनोद चव्हाण, संजय जाधव, साधना ताम्हाणे, उत्तम तारु, निखील जाधव, मोहसीन शेख, नागनाथ राख, शंकर नेवसे, गणेश थोरात, प्रमोद कोकणे यांनी केली आहे…