पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दिनांक ०६/०३/२०२३ रोजी ससुन हॉस्पीटल येथुन मिळालेल्या माहितीनुसार रितु मालवी या महिलेचा पाय घसरुन मृत्यु झाल्याची माहिती देण्यात आली होती. सदर घटनेत काही घातपात अथवा संशयाचा प्रकार आहे का याची चौकशी करीत असतांना मयताचे झाले तपासाचे चौकशीअंती कागदपत्राचे अवलोकन करता, रितु हिचा मृत्यु हा तीची सासु हिने किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातुन शिवीगाळ करुन केलेल्या मारहाणीत झाला होता.. खुनाचा गंभीर गुन्हा लपविण्यासाठी आरोपी सासु हिने तिला उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिचा पाय घसरुन बेशुध्द झाल्याची माहिती डॉक्टरांना दिली होती.
विमानतळ पोलीसांना या घटनेत संशय निर्माण झाल्यामुळे सासु हिचेकडे केलेल्या अधिक तपासात त्यांनी सुन रितु हिस हाताने मारहान करुन फ्रिजवर ढकलुन, जमिनीवर डोके आपटुन खून केल्याची कबुली दिली. त्या दोघींमध्ये यापुर्वी देखील किरकोळ कारणावरुन वारंवार भांडणे होत होती. त्यातुनच दि. ०७/०३/२०२३ रोजी सासु हिने रागाच्या भरात सुन रिंतु माळवी हिंस मारहाण करुन त्या मारहाणीत ती फरशीवर पडल्यानंतर, तीचे केसाला पकडुन तीचे डोके जमीनीवर आपटुन तीला जीवे ठार मारले होते. याप्रकरणी विमानतळ पोलीसांनी आरोपी सासुविरुध्द विमानतळ पो स्टे १२७/२०२२ भादविक ३०२, २०३, ५०४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करुन तीस अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि लहाने विमानतळ पो स्टे हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, परि ४. पुणे शहर, श्री. शशिकांत बोराटे, राहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे, श्री. किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पो. रटे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विलास सोंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती. संगिता माळी.. सहा. पो. निरी. एस. एन. लहाणे, म.पो.उप निरी.समु चौधरी, सहा. पोलीस फौज शेवाळे, पोलीस अंमलदार, पठाण व तोडेकर यांनी केलेली आहे.