ईसा तडवी जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गाळण:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धडाडीच्या नेत्या सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी हाती घेतलेल्या नि:शुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज गाळण येथे संपन्न झाले.
प्रथमतः निर्मल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा श्रीमती कमलताई पाटील व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्जवलाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. गाळण व पंचकोशीतील लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे अशा गरजू लोकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून सुमारे 220 रुग्णांची तपासणी जळगाव येथील नेत्रचिकित्सक डॉ. जॅकी शेख, डॉ. विष्णू पाटील व त्यांचे सहकारी डॉ. विनोद पाटील यांच्याकडून करून घेतली. त्यातीलसुमारे 38 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध कांताई नेत्र चिकित्सालय या ठिकाणी पाठविण्यात आले. रुग्णांची तपासणी, जळगाव येथे येण्या – जाण्याचा तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च सौ. वैशाली सुर्यवंशी करीत आहेत.
याप्रसंगी श्री.अरुण पाटील (शेतकरी नेता), श्री. संदीप जैन (उपजिल्हाप्रमुख,युवासेना), श्री.भुपेश सोमवंशी (तालुका प्रमुख,युवासेना),गावातील सरपंच श्री राजेंद्र सावंत, उपसरपंच श्री. ईश्वर पाटील,गावची पोलीस पाटील श्री दादासाहेब बोरसे,गावची तंटामुक्ती अध्यक्ष श्री सचिन पाटील, शिवसैनिक श्री पृथ्वीराज पाटील श्री ओम बोरसे,डॉ. योगेश पाटील श्री देविदास पाटील श्री शेखर पाटील श्री रोहन राजपूत श्री प्रवीण सावंत,श्री अक्षय पाटील श्री राजू शेलार श्री भाऊलाल राठोड श्री महेश पाटील श्री रुपेश पाटील,शिबिराच्या यशस्वीतेसाठीसाठी श्री. नंदकिशोर पाटील, श्री. सुनील पाटील, श्री गणेश मोरे, श्री समाधान पाटील यांनी अथक परिश्रम घेतले आदि पदाधिकारी उपस्थित होते.