इंदिरा बहुउद्दशीय शिक्षण प्रसारक मंडळ मालेगाव संस्थेच्या अभिनव उपक्रम.
प्रशांत जगताप मुख्यसंपादक 7385445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जागतिक महिला दिनानिमित्त सर्विकडे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. नेतृत्ववान, कर्तृत्ववान अशा महिलांचा गौरव होणे म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळणे असे होते. पण इंदिरा बहुउद्दशीय शिक्षण प्रसारक मंडळ मालेगाव संस्थेच्या अध्यक्षा सीमा सुरोशे यांनी आज समाजाला नवीन आयाम घालून दिला. त्यांनी या जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान द्विपंथी (किन्नर) यांच्या सत्कार करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
इंदिरा बहुउद्दशीय शिक्षण प्रसारक मंडळ मालेगाव संस्थेच्या वतीने कर्तुत्ववान द्विपंथी (किन्नर) महिला यांच्या सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचा अध्यक्षा सीमा सुरोशे या होत्या. यावेळी द्विपंथी (किन्नर) समाजात जागृती निर्माण करणाऱ्या, द्विपंथी (किन्नर) समाजासाठी शिक्षण, आरोग्य त्यांचे प्रश्नसाठी कार्य करणाऱ्या. सामाजिक क्षेत्रात समाजसेवे बरोबरच किन्नर प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या सामाजिक, तसेच किन्नर प्रश्न मार्गी लावून न्याय मिळवून देणाऱ्या राजेश्वरी अम्मा आराधी जोगती प्रदेशध्यक्ष खटूक श्यमजी महाकाल आखाडा उज्जैन श्री. श्री. 1008 महामंडलेश्वर सरस्वती यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व समाजासाठी न्याय, हक्क, अधिकार आणि संविधान निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा राजेश्वरी अम्मा यांना भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी बोलताना इंदिरा बहुउद्दशीय शिक्षण प्रसारक मंडळ मालेगाव संस्थेच्या अध्यक्षा सीमा सुरोशे आज या समाजापासून अलिप्त असल्याचे द्विपंथी (किन्नर) मधील कर्तुत्ववान महिला नेहमी दुर्लक्षित राहिल्या. या समाजाने हेतूपुरस्कृत त्यांना दुर्लक्षित केलं. त्यामुळे आज आम्ही कर्तुत्ववान द्विपंथी (किन्नर) यांचा सन्मान सत्कार करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे जागतिक महिला दिनी हा अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून योगिताताई, निखील चोव्हाण, किरण तायडे, स्वप्नील शेळके, सचिन नजमा खान, बागनताई हे उपस्थित होते. या सर्वाचे आभार सविता इंगळे यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील महिला आणि नागरिक उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348