✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई,10 मार्च :- पुण्यातील विश्रांतवाडी येथून नराधम सासरच्या मंडळींनी संगनमत करून आपल्या सुनेचा छळ करत तिच्या मासिक पाळीच्या दरम्यान तिचे हात पाय बांधून तिचे रक्त काढले आणि ते रक्त एका मांत्रिकाला ५०००० रूपयाला विकले या घटनेचा पुणे भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या महिला आघाडी कडून पुण्यातील अघोरी घटनेचा निषेध करून वरिष्ठ पोलिस निरिक्षक दत्तात्रेय भापकर यांची तात्काळ घेतली भेट उचित कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन दिले. यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
पुण्यातील विश्रांतवाडी येथील महिला सोबत तिच्या सासरच्या लोकांकडून अघोरी कृत्य करण्यात आले. तिच्या मासिक पाळी चे रक्त तिचे हात पाय बांधून . आणि एका मांत्रिकाला ५०००० रूपयाला विकले हा प्रकार ऑगस्ट २०२२ मध्ये बीड या ठिकाणी घडला होता असं वरिष्ठ पोलिस निरिक्षक दत्तात्रय भापकर सांगितले. ७ मार्च २०२३ ला विश्रांतवाडी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला.
या संदर्भात त्या पिडित महिलेने विश्रांतवाडी पोलिस स्टेशन मध्ये तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून तो बीड पोलिसांकडे वर्ग केला आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348