संदिप सुरडकर, नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:– छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती 10 मार्च 2023 रोजी लाल गंज झाडें चौक नागपूर येथे शिवसेना युवासेना तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव 10 मार्च 2023 रोजी लाल गंज झाडें चोक नागपूर येथे तिथीनुसार सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज यांची युवा सेना यांच्या तर्फे फळ वाटपच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी युवासेनेचे श्री. शरद सरोदे, श्री. सोनू गौर, श्री. मुल्ला सिंग गौर, सुकलाल मरोडे, छोटू राऊत, रोशन पाटील, विशाल आणी समस्त युवा सेना पदाधिकारी यांच्या उपस्थिती होती.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348