अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- श्री क्षेत्र वाकी येथे 3 मार्च पासून बाबांच्या 80 व्या वार्षिक उर्सला सुरुवात झाली असून 9 मार्चला समापन झाले. या उर्स दरम्यान केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी वाकी दरबार मध्ये येऊन चादर चढवली. त्यांच्यासोबत अशोकजी धोटे, मिलिंद केदार, अरविंद गजभिये आणि ट्रस्टचे
विश्वस्त उपस्थित होते.
3 मार्चला ताजबाग नागपूर येथून शाही संदल निघून वाकी येथील प.पु.काशिनाथजी डहाके पाटील यांच्या वाड्यात पोहोचला तिथून सायंकाळी 7 वाजता वाकी दरबार येथे पोहोचला. परंपरेनुसार गद्दीनशीन ज्ञानेश्वरराव डाहाके पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन झाले यावेळी आ.सुनीलबाबू केदार, शिवाजीराव मोघे, डॉ. अशोक जीवतोडे, अशोक सिंग चव्हाण, सय्यद जरबीर ताजी सज्जादानशीन ताजबाग शरीफ नागपूर. ताज अहमद राजा ट्रस्टी ताजबाग शरीफ नागपूर, हाजी इम्रान ताजी ट्रस्टी ताजबाग शरीफ नागपूर, सौ. अरुणाताई शिंदे सभापती पं.स.सावनेर, सौ.उईके सदस्य जि. प.नागपूर, सौ.जिजाबाई बागडे सदस्य पं.स.सावनेर, सौ.अन्नपूर्णा डहाके सरपंच ग्रा.पं वाकी, अमोल केने सरपंच सावरमेंडा, शेख हारून या पाहुण्यांच्या उपस्थितीत महापूजा होऊन उर्सला सुरुवात झाली होती.
4 व 5 तारखेला रोज मिलाद व कव्वालीचा कार्यक्रम झाला. 6 मार्च ला सकाळी 9 वा. कुलशरीफचा कार्यक्रम राजे रघुजीराव भोसले व माधोजींराव भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. 7 मार्च ला सकाळी 10 वा.ह.भ.प.निलेश बुटे महाराज आळंदीकर यांचे कीर्तन झाले. 8 मार्च ला सकाळी 10 वाजता ह.भ.प. कनेरकर महाराज (चिखल सावंगी) यांचे कीर्तन झाले. 9 मार्च ला सकाळी 9 वाजता ह.भ.प डॉ.जलाल महाराज सय्यद (नाशिक ) महाराष्ट्र यांचे गोपाल काल्याचे किर्तन होऊन उत्सवाचा समारोप झाला.
उर्स दरम्यान असंख्य भाविकांनी नियमाचे पालन करूनच बाबांचे दर्शन घेतले.कोणत्याही प्रकारची अनहोनी घडली नाही. उर्स दरम्यान दररोज भाविकांना ट्रस्टतर्फे महाप्रसाद वितरित करण्यात आला. अशी माहिती ट्रस्टचे सचिव ज्ञानेश्वर डहाके पाटील अध्यक्ष प्रभाकर डहाके पाटील, विश्वस्त मधुकर टेकाडे, डॉ.बाबुराव ताजने, सचिन डांगोरे यांनी दिली.