अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अशोक वाटीका कडुन गौरक्षण रोड वर जाताना वाटेत हुतात्मा चौकात गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी बांधकाम विभाग महानगरपालिका अकोला, सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला, तसेच प्रा. संजय खडसे साहेब निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
नुकताच नेहरु पार्क चौकातून घराकडे दुचाकीने जाणाऱ्या आई व मुलीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला व तिची आई गंभीर जखमी झाली असून तिला खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते परंतु त्या महिलेचाही मृत्यू झाला. म्हणून भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाला आळा बसावा म्हणून या हुतात्मा चौकात चारही बाजूने गतिरोधक बसविण्यात यावे अन्यथा आम्ही बांधकाम विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करू याची नोंद घ्यावी लवकरात लवकर हे गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे गेले असता तो रस्ता महानगरपालिका कडे आहे म्हणून उमेश सुरेशराव इंगळे यांनी उपायुक्त बांधकाम विभाग महानगरपालिका अकोला, सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.