पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
स्वारगेट पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- सचिन परशुराम माने वय-२४ रा.४२५ / २६ औदयोगिक वसाहत, गुलटेकडी, पुणे (टोळीप्रमुख) व त्यांचे इतर १३ साथीदारासह आजूबाजुचे भागात दरोडा, जबरी चोरी, खंडणी, हप्ता गोळा करणे, अवैध मार्गाने आर्थिक प्राप्तीसाठी आपले गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्याचे हेतूने खुनाचा प्रयत्न गैरकायद्याची मंडळी जमवून घातक शस्त्रांसह या भागात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरीचोरी, मारामारी, घातक शस्त्रे बाळगणे मुलींची छेडछाड अशा स्वरुपाची गुन्हेगारी कृत्ये सातत्याने चालू ठेवलेली आहेत. त्याबाबत स्वारगेट पोलीस ठाणे गु.र.नं. ६१/ २०२३ भा.द.वि. कलम ३०७,३२४, ३२६, १४३, १४७, १४८, १४९,४२७, १०८, ५०६ भारतीय हत्यार का. क.४ (२५) महा. पो.अ. ३७(१) सह १३५, १४२, क्रि. ल. अॅ. अॅक्ट क. ७ अन्वये सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) सचिन परशूराम माने वय-२४ रा. ४२५/२६ औदयोगीक वसाहत, गुलटेकडी, पुणे (टोळीप्रमुख) २) निखील राकेश पेटकर वय २२ वर्षे रा. आईमाता मंदिर, बिबवेवाडी, पुणे वय २७ रा.४२५/२६ गल्ली नं. १४ मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी, पुणे ४) अजय प्रमोद डिखळे वय २४ रा. संत नामदेव शाळे जवळ, औद्योगीक वसाहत, गुलटेकडी, पुणे ५) यश किसन माने वय १८ वर्षे रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी, पुणे ६) अमर तानाजी जाधव वय-३२ रा. ४२५ / २६ औदयोगिक वसाहत, गुलटेकडी, पुणे ७) विजय प्रमोद डिखळे वय १८ वर्षे रा. समाज मंदिराजवळ स.नं ४२५/२६ औदोगिक वसाहत, गुलटेकडी, पुणे ८) मोन्या ऊर्फ सुरज सतिष काकडे वय २६ रा. संतनामदेव शाळेजवळ, महर्षीनगर, औदयोगिक वसाहत, पुणे ९) एक विधीसंघर्षित बालक (टोळी सदस्य) व इतर ४ साथीदार पाहिजे आरोपी यापैकी आ.क्र. १ ते ८ यांना अटक करण्यात आली असुन, अ. क्र. ९ यास ताब्यात घेण्यात आले आहे यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागील काळात केले असल्याने त्यास सन २०२१ मध्ये ०१ वर्षा करीता स्थानबध्द करणेत आले होते नमूद आरोपी सदर कारवाईतून सुटलेनंतर पुन्हा त्याने आपले साथीदारांना एकत्र करून खुनाचा प्रयत्न व दुखापतीचे गुन्हे केले आहेत. व स्वतःचे व साथीदारांचे उपजिवीके करीता जबरदस्तीने दहशत करून हप्ते वसुली केली आहे. तपासा दरम्यान सचिन माने (टोळीप्रमुख) हा स्वतःचे व आपले टोळीचे वर्चस्व स्थापीत करणे करीता साथीदारांचे मदतीने खुनाचा प्रयत्न, दुखापत, दरोडा, जबरीचोरी तसेच घातक हत्यारे बाळगून आपली टोळी चालविणे करीता अवैधरीत्या हप्ते गोळाकरणे खंडणी मागणे अशी बेकायदेशीर कृत्ये करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचे व त्याचे साथीदारांचे दहशती मुळे कोणीही तक्रार करणेस धजावत नसलेचे दिसत असल्याने त्याच्या अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालणे करीता त्याचे विरुद्ध सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(४) चा अंतर्भाव करून मकोका कायद्यान्वये कारवाई होणे बाबतचा प्रस्ताव अशोक इंदलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे यांनी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २ पुणे शहर यांचे मार्फतीने मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे यांना सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी यांना स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. ६१/२०२३ भा.द.वि. कलम ३०५,३२४, ३२६, १४३, १४७, १४८, १४९,४२७, १०८, ५०६ भारतीय हत्यार का. क.४ (२५) महा. पो. अधि. ३७ (१) सह १३५.१४२, क्रि. लॉ अॅ. अॅक्ट क.७ अन्वये प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii).३ (२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेंद्र डहाळे यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा १ श्री. सुनिल पवार अतिरीक्त कार्यभार स्वारगेट विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त परि. २ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, अति कार्यभार स्वारगेट विभाग, पुणे श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक इंदलकर पो. निरी गुन्हे स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे श्री. सोमनाथ जाधव तसेच सहा पो. निरी प्रशांत संदे मो.उप निरी. अशोक येवले, श्रेणी पो.उप निरी प्रमोद कळमकर, पोलीस अंमलदार विजय खोमणे, सुनिता आंधळे तारू पो. अंम चव्हाण, पवार, खंदाड, शेख, कांबळे, गायकवाड, गोडसे, शेख, घुले सर्व सवारगेट पोलीस ठाणे यांचे पथकाने केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही १६ वी कारवाई आहे.