✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंदिया:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम शिक्षकाने गुर शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली.
गोंदिया तालुक्यातील एका जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत एका शिक्षकाने वर्गात विद्यार्थी बरोबर अश्लील चाळे केले. याबद्दल एक दोन नव्हे तर तब्बल आठ विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करून वर्गातच बॅड टच करणाऱ्या शिक्षकांवर रावणवाडी पोलिसात बाललैंगिक अत्याचार अधिनियमन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात आणि शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विद्यार्थांना शिक्षण देऊन भावी पिढी घडवण्याची जबाबदारी असते. पण एका शिक्षकावरच अश्लील चित्रफित दाखवल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संजय अग्रवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. गोंदिया तालुक्यातील एका जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या आरोपी शिक्षकाने पाचव्या वर्गातील समोरच्या टेबलवर बसणाऱ्या मुलींना अश्लील चित्रफित दाखविली. चित्रफित दाखवित असताना त्याने मुलींना बॅडटच देखील केले.
यासंदर्भात मुलींनी पालकांकडे तक्रार केली. मुलींनी सांगितलेल्या या प्रकाराने पालकांना धक्का बसला. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. संबंधित पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी या घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना दिली. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून शिक्षकाला अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.