✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्य शासनाच्या मालकीच्या नोंदणीकृत असलेल्या व नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पुर्ण झालेल्या वाहने निष्कासित करावे, असे आवाहन परिवहान विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
राज्यातील वाहनांचे प्रदुषण कमी करणे, रस्त्यावरील प्रवासी तसेच वाहनांच्या सुरक्षितेमध्ये वाढ करणे, वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे, वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे तसेच जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणने व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होण्यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन निष्कासन व नोंदणी नियम2021 प्रसिध्द केलेले आहे.
सर्व शासकीय कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्य 15 वर्ष पूर्ण झालेल्या शासकीय वाहनांचे निष्कासन करण्याकरीता सदर वाहनाची माहिती www.mstcecommerce.com/auctionhome/elv/index.jsp या संकेतस्थळावर 8 दिवसाच्या आत अपलोड करावी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समिर मो. याकुब यांनी कळविले आहे.