संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बोटगाव:- दिनांक 11 मार्च रोज शनिवारीला विश्व जल दिवस जागृक्ता व जागतिक महिला दिवस मौजा बोटगाव मध्ये अंबुजा सिमेंट फाउंडेशन, उप्परवाहीच्या वतीने मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी शेतकरी महिला मध्ये पाण्या विषयी जागरूकता यावी यासाठी महिलांनासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, सदर मेळाव्यात “पाणी हे जीवन आहे” याचे महत्व पटवून देण्यासाठी विविध मॉडेल्सचे आयोजन करण्यात आले, विश्व् जल दिवसला अनुसरून विविध छोटी प्रातिकृती चे महिलांन कडून आयोजन करण्यात आले यात सुंदर पाणी व्यवस्थापन संबधी उत्कृष्ट मॉडेला पारोतिषीक देवून गौरन्वित करण्यात आले.
यावेळी शेतकरी महिलांना जागतिक महिलां दिवसाला अनुसरून महिलां सक्षमीकरणं उद्देशाने सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच महिलांना साठी विविध स्पर्धात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले यात प्रामुख्याने शाल व श्रीफळ देऊन शिक्षकांचा सत्कार सोहळा, रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची, गीतगायन स्पर्धा, जनरल नॉलेज, उंच उडी द्वारा बिस्कीट तोडणे या प्रकारच्या खेळाचे आयोजन करण्यात आले.
सदर कर्यक्रमात प्रमुख उपस्थिती सरपंच श्री भास्कर देवतळे, पियू मॅनेजर अंबुजा सिमेंट फाउंडेशन श्री पवन कुणाघाटकर सर प्रक्षेत्र अधिकारी रजनी खानोरकर, पल्लवी बेसूरवार तसेच गावातील बहुसंख्येने शेतकरी महिलां उपस्थिती होते.