पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १०/०३/२३ रोजी सकाळी दोन इसमांनी एका इसमाची रिक्षा जबरदस्तीने चोरुन घेवुन पळुन गेले आहेत. त्याअनुषंगाने समर्थ पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. समर्थ पोलीस स्टेशनचे पोनि रमेश साठे यांनी तात्काळ तपास पथकाचे सपोनि प्रसाद लोणारे व त्यांचे टिमला आरोपींचा शोध घेवून अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास पथकाने सपोनि लोणारे यांनी तात्काळ तपास सुरु केला.
यातील फिर्यादी राजु डेव्हीड हे निशांत टॉकीज जवळ पॅसेंजरची वाट पहात असतांना यातील आरोपी यांनी त्याठिकाणी येवुन फिर्यादी यांना दमदाटी करून जबरदस्तीने फिर्यादी यांचे खिशातून रिक्षाची चावी काढून फिर्यादी यांची रिक्षा जबरदस्तीने पळवून घेवून गेले होते. त्यादरम्यान पोलीस अंमलदार हेमंत पेरणे व कल्याण बोराडे यांना बातमी मिळाली की तो नागपुर जेल मधुन एमपीडीए कारवाई मधुन सुटलेला सराईत गुन्हेगार फिरोज उर्फ बबाली मकबुल खान वय ४९, रा. एडी कैम्प चौक, पुणे याने व त्याचा मित्र इम्रान मेमन वय ५८, रा. कोंढवा, पुणे यांनी दोघांनी मिळुन सदरचा गुन्हा करून रिक्षा घेवुन पळुन गेल्याची माहीती मिळाली. आरोपी हे मोबाईल वापरत नसल्याने तपास सुरु केला दरम्यान आरोपीचा शोध घेत असतांना माहीती मिळाली की, सदरचे आरोपी हे पत्राचाळ येथे थांबल्याची माहीती मिळाली, तात्काळ सपनि प्रसाद लोणारे व त्यांचे पथकाने सापळा रचुन गुन्हातील दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेतले व जबरदस्तीने चोरून नेलेली रिक्षा त्यांचेकडुन हस्तगत करण्यास आली.
सदर आरोपी यांना गुन्हा घडल्याच्या दोन तासात पकडण्यात सपोनि प्रसाद लोणारे व त्यांचे टिमला यश आले. यातील आरोपी फिरोज उर्फ बबाली मकबुल खान हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर आतापावेतो एकुण ५९ गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी त्याचेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. परंतु नुकताच पाच दिवसापुर्वी सदरचा आरोपी हा मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाने नागपुर जेलमधुन सुटलेला होता. जेलमधुन सुटल्यावर सदर आरोपी याने त्याचा मित्र इमान मेमन याचे सोबत सदरचा गुन्हा केलेला होता. सदर गुन्हयाचा तपास सपोनि प्रसाद लोणारे हे करीत आहे.
सदरची कामगिरी ही मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग श्री राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, पुणे शहर, श्री संदीप सिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश साठे समर्थ पो.स्टे. पोलीस निरीक्षक (गुन्हे). श्री प्रमोद वाघमारे यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, रहिम शेख, कल्याण बोराडे, दत्तात्रय भोसले, प्रमोद जगताप, रोहीदास बाधीरे, अमोल शिंदे, श्याम सूर्यवंशी यांनी केली आहे.