महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार समीर कुणावर यांचे प्रतिपादन.
✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई/हिंगणघाट:- 9 मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा ऐतिहासिक आणि सोनेरी शब्दात लिहिलेला असून शेतकऱ्यांच्या, महिला, आदिवासी व सर्व घटकांच्या हिताचा तो आहे असे मत सभागृहात मांडले.
यावेळी पुढे बोलताना आमदार समीर कुणावर म्हणाले की, केंद्र सरकारच्या 6 हजार रुपये मदत निधी ला राज्य सरकार द्वारे आता पुन्हा नमो सन्मान निधीच्या माध्यमातून मिळणारे 6 हजार रुपये हे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहेत. महिलांना बस प्रवासात 50% सवलत, आशा सेविकांच्या मानधनात केलेली वाढ, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता 5 लाख पर्यंतचा फायदा सामान्य लोकांना होणार असून यातून देखील कित्येक लोकांचे जीव वाचणार आहेत, आनंदाच्या शिधा आता गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबडेकर जयंती निमित्त सुद्धा दिल्या जाणार असून यातूनही जनतेच्या जीवनात आनंद येणार आहे. एकंदरीत हा अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या शेवटच्या व्यक्तीला सुद्धा आनंदी निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी आहे असे मत व्यक्त करत या अर्थसंकल्पाचे कौतुक केले.