उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई/सांगली:- राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी म्हणून शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपला वंचित बहुजन आघाडीने जाहीर समर्थन दिले आहे. याबाबत वांचीतचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली.
यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये पेन्शन स्कीम बंद करण्यात आली. बंद करते वेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की वीस वर्षानंतर याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होतील. आज ते परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्याने जुनी पेन्शन स्कीम सुरू करावी म्हणून आंदोलनाला सुरुवात केली आहे. कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे. पेन्शन चालू झाली पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे. काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला यामुळे काँग्रेस पक्षाचेही आम्ही अभिनंदन करतो. पेन्शन स्कीम लागू झाली पाहिजे यासाठी आपण लढताय त्याबद्दल पक्षाच्या वतीने शुभेच्छा!