पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
अमली पदार्थ विरोधी पथक 2 पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- दिनांक14 /03/2023 रोजी अमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील पो नि सुनिल थोपटे, व स्टाफ खडक पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अमली पदार्थ गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माहिती काढण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना *पोलीस नाईक साहिल शेख व पो कॉ अझीम शेख यांना बातमी मिळाली की, कानिफनाथ विष्णू नायडू हा इसम काहीतरी अमली पदार्थ विक्री करिता खडक पोलीस स्टेशन हद्दीमधील काशेवाडी जवळ येणार आहेत. अशी मिळाले बातमी नुसार त्याबाबत सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून सदर बाबत छापा कारवाई करून संशयावरून पोलीस अंमलदार यांचे मदतीने सदर इसमांला ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्याचे जवळ 10ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ 200000किंमत रुपये *व 10000कीं रु चे दोन मोबाईल असा एकूण 210000/- ऐवज मिळून आला आल्याने तो जप्त करून त्याचे विरुद्ध खडक पोलीस ठाणे येथे N.D.P.S.Act ८(क) 22(ब ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही माननीय अप्पर पोलीस आयुक्त सो गुन्हे श्री रामनाथ पोकळे ,मा पो उप आयुक्त सो गुन्हे श्री अमोल झेंडे, मा सहा पो आयुक्त गुन्हे श्री नारायण शिरगावकर, यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे अधिकारी पो नि सुनील थोपटे, पो उप निरी. डी एल चव्हाण, पो हवा संतोष देशपांडे , पो. ना शेळके,पो.ना. साहिल शेख,पो. शि. अझीम शेख, पो शि नितीन जगदाळे पो शि युवराज कांबळे, यांनी केली आहे….