पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- पुणे ग्रामीण हद्दीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव रामभाऊ तावरे व त्याचा साथीदार आदित्य प्रकाश वाटविसावे हे दोघे कोथरुड पोलीस ठाणे हद्दीमधील आशिर्वाद मेसचे बाजुचे पुणे- बेंगलोर हायवेकडे वारजेच्या दिशेने जाणा-या सर्व्हिस रोड येथे येणार असुन, त्यांनी त्यांचे कब्जामध्ये विनापरवाना व अनाधिकृतपणे पिस्टल व राउंड बाळगले आहेत, अशी तपासपथकातील पोलीस अंमलदार चौधर व दहिमाते यांना गोपनीय बातमीदारांमार्फत खबर मिळाल्याने.खबरीप्रमाणे तात्काळ वरिष्ठांना कळवून त्यांचे आदेश व सूचनेप्रमाणे तपासपथकातील अंमलदार यांनी नमुद ठिकाणी सापळा रचुन वर नमुद गुन्हेगारांना ताब्यात घेतले.
सदर आरोपींना त्यांचे नाव पत्ता विचारता, त्यांनी आपली नावे १) वैभव रामभाऊ तावरे, वय २३ वर्षे, रा. फ्लॅट नं. ४०२ भोसले हाईट्स, शेवटचा बसस्टॉप, धायरी, पुणे व २) आदित्य प्रकाश वाटविसावे, वय २३ वर्षे, रा. वाटविसावे चाळ, धायरी फाटा, वडगाव खुर्द, पुणे अशी असल्याचे सांगुन त्यांची अंगझडती घेता आरोपी वैभव रामभाऊ तावरे याचे ताब्यातुन ३०,०००/- रु. किमतीचे गावती बनावटीचे पिस्टल व आरोपी आदित्य वाटविसावे याचे ताब्यातुन ०२ जिवंत राऊंड मिळून आले. सदर पिस्टल व राऊंड हे नमुद आरोपींनी विनापरवाना व अनाधिकृतपणे कब्जात बाळगल्यामुळे त्यांचेविरुद्ध कोथरुड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ११४/२०२३, आर्म्स अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे दिनांक १२/०३/२०२३ रोजी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सध्यस्थितीत सदर गुन्ह्याचा तपास पो हवा. १९६५ चौधर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त परि-३ पुणे शहर श्री. सुहेल शर्मा, मा. सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग पुणे श्रीमती रुक्मिणी गलंडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर श्री हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्ह) बाळासाहेब बड़े, पोउपनिरी बसवराज माळी, पोलीस अंमलदार चौघर, चौगुले, दहीमाते, राऊत, सूळ, शिर्के, वाल्मिकी यांनी केली आहे.