छावा फाउंडेशन व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी यांचा अनोखा वाढदिवस.
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 16 मार्च:- अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी आज राजुरा तालुक्यातील विविध कार्यक्षेत्रातील अनेक कर्मचारी यांनी पंचायत समिती राजुरा ते तहसील कार्यालय पर्यंत काढलेल्या रॅलीतील सहभागी आंदोलकर्त्यांना पाणी बॉटल वितरण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे चंद्रपूर जिल्हा युवा सचिव तथा छावा फाउंडेशन चे उपाध्यक्ष बबलू चव्हाण व नेफडो चे राजुरा शहर सचिव तथा छावा फाउंडेशन चे सचिव आकाश वाटेकर यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी आपल्या वाढदिवसा निमित्याने राजुरा येथे पंचायत समिती चौक येथून निघालेल्या अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी निघालेल्या राजुरा तालुक्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र तालुका राजुरा व जुनी पेन्शन हक्क समन्वय समिती मार्फत निघालेल्या रॅलीतील सहभागी आंदोलनकर्त्या कर्मचारी यांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल वितरित केल्या.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणी छावा फाउंडेशन राजुरा या संस्था सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत असून आपल्या अनोख्या उपक्रम, कार्यक्रम, समाजसेवे करिता या संस्था ओळखल्या जात आहेत. यावेळी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, संतोष देरकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, नेफडो, आशिष करमरकर, अध्यक्ष, छावा फाउंडेशन तथा चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष नेफडो, रुपेश चीडे, चंद्रपूर जिल्हा सचिव, नेफडो, मनोज तेलीवार, राजुरा तालुका अध्यक्ष, नेफडो, तसेच छावा फाउंडेशन व नेफडो चे संदीप पोगला, अमोल राऊत, गौरव रागीट, प्रज्वल कुईटे, गणेश रागीट, पवन टेकाम, पियुष टेकाम, अंकित रागीट, सुमित इटनकर, राहुल अंबादे, रकिब शेख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.