पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात छोटे मोठे व्यावसायीक, कंपनी तसेच जनतेकडून कोणत्याही प्रकारे जमदरती करून, त्यांचेकडून हप्त वसुली करुन, खंडणी गोळा करणाऱ्या इसमाबाबतची माहिती निर्भिडपणे देण्याकरीता पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथकामार्फत दर्शनीय भागावर फ्लेक्स लावुन, नागरीकांना निर्भीडपणे तक्रार द्यावी याबाबत जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने फळविक्री व्यावसायीकाने खंडणी विरोधी पथक कार्यालयात समक्ष हजर राहून कळविले की, सुमारे १ वर्षापासुन साने चौकाजवळील भाजीमंडई, चिखली, पुणे येथे फळविक्रीचा व्यवसाय करीत असुन इसम नामे बाळा गारुळे हा त्याचे साथीदार मयुर, संदीप, भरत व त्यांचे इतर ०३ अनोळखी साथीदार हे अन्याय करुन दररोज ५०/- रुपये प्रमाणे जबरदस्तीने हप्ता म्हणून खंडणी घेत आहे. हप्ता न दिल्याने जीवे मारण्याची धमकी देवून, गल्यातुन जबरदस्तीने हप्ता म्हणून २००/- रुपये काढुन घेतले असून, आतापर्यंत त्यांचेकडुन २१,०००/- रुपये रक्कम जवरदस्तीने हप्ता म्हणुन खंडणी घेतली आहे. अशी तक्रार दिल्याने, त्याबाबत वपोनि अरविंद पवार यांनी तात्काळ दखल घेवुन, सदर प्रकार वरिष्ठांना कळविला असता, वरिष्ठांनी सदर बाबत दिलेल्या आदेश व सुचना प्रमाणे व्यावसायीकाने दिलेली राकार घेवुन त्याबाबत चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १६७/२०२३ भादवि कलम ३८६, ३९२, २९४, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन, त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे ते स्टाफसह पाहिजे आरोपींचा निगडी व चिखली परिसरात शोध घेत असताना, पोहवा ८५६ रमेश मावसकर व पोहवा ८८१ गोडांबे यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून आरोपी नामे १) बाळु उर्फ जयंत नारायण गारुळे वय ४६ वर्षे रा. राजे शिवाजीनगर से नं. १६, चिखली पुणे २) संदीप बाबुराव बाबर वय २८ वर्षे रा. मोरेवस्ती चिखली पुणे ३) मारत नवनाथ सोनावणे वय २२ वर्षे रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती चिखली पुणे यांना दिनांक १४/०३/२०२३ रोजी २२:३० वा. भाजी मंडई साने चौक चिखली पुणे येथून ताब्यात घेवुन, त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी गुन्हा केला असल्याची तोंडी कबुली दिली. नमुद आरोपीतांनी चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १६७/२०२३ भादवि कलम ३८६.३९२, २९४, ३२३.३४. हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांना पुढील कारवाईकामी चिखली पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास चिखली पोलीस स्टेशन हे करत आहे.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी. अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अंमलदार रमेश गायकवाड, सुनिल कानगुडे, निशांत काळे, रमेश मावसकर, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, आशिष बोटके, गणेश गिरीगोसावी, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड व प्रदीप गुट्टे यांचे पथकाने केली आहे.