पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
अंमली पदार्थ विरोधी पथक – १ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अंमली पदार्थाच्या होणा-या तस्करीवर निर्बंध घालण्याकरीता आदेश दिले होते. त्याअनुशंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, सहा. पोलीस निरीक्षक शैलजा जानकर व स्टाफ असे दिनांक १४/०३/२०२३ रोजी पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, विशाल दळवी यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम पुणे वानवडी येथील हुतात्मा श्रीकांत लिंगायत रोडवरील हर्षवर्धन ग्राऊंडच्या फुटपाथ जवळ सार्वजनिक रोडवर गांजा विक्री करीता येणार असल्याचीमाहिती मिळाली.
सदर ठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचुन थांबले असता इसम हर्षद हनुमंत थोरात, वय-२० वर्षे, रा. सिध्दार्थनगर गल्ली नं.३ / ४. एन. आय.बी.एम. कोंढवा, पुणे हा त्याचे ताब्यात एकुण ४,२९,०००/- रू किचा मुद्देमाल त्यामध्ये ५,०००/- किचा एक रेडमी- ९ कंपनीचा मोबाईल व ४,२४,०००/- रु किंचा २१ किलो २०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचेविरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३१ / २०२३ एन.डी.पि.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस राह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे मा. सहा पो आयुक्त गुन्हे – १, पुणे शहर, श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे अंमली पदार्थ विरोधी पथक-२ गुन्हे शाखा पुणे शहर, सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, विशाल दळवी, ज्ञानेश्वर घोरपडे.. मारुती पारधी, संदिप शिर्के, राहुल जोशी, संदेश काकडे व नितेश जाधव यांनी केली आहे..