✒️मंगेश जगताप, मुंबई (विक्रोळी) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- बृहन्मुंबई महानगरपालिका निधीच्या माध्यमातून आणि तेथील स्थानिक नगरसेविका सौ. स्नेहलताई सुनील मोरे यांच्या प्रयत्नाने शिवसेना प्रभाग क्र. १२३ (पार्कसाईट) येथील शिवगर्जना सोसायटी, जयअंबे सोसायटी, गुरुकृपा सोसायटी या गृहनिर्माण सोसायटींमध्ये पायवाटांच्या कामाचा श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
सौ. स्नेहल मोरे नगरसेविका प्रभाग १२३ अध्यक्षा एन प्रभाग समिती, सदस्या महिला बाल कल्याण समिती, सदस्या सुधार समिती यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
प्रसंगी उपशाखा संघटिका सौ. अर्चनाताई खिलारे, सौ. वासंतीताई शेलार, उपशाखाप्रमुख श्री. मनोहर पवार, गटप्रमुख सौ. वासंतीताई राणे, श्री बळीराम दाभेकर, श्री. कृष्णा जाधव, श्री. सहदेव शेलार, सोसायटीतील पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.