संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- मौजा तुलाना या गावात दिनांक १५ मार्च रोजी खुशी महिला ग्रामसंघ व अबुंजा फोडेंशन उमेदच्या सहयोगाने महिला जागतिक दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला, कार्यक्रमा प्रसंगी महिलांचे विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंदाताई जेनेकर (माजि. प. स. सभापती) कार्यक्रमाचे उद्घघाटक जयप्रकाश निर्मल (साहाय्यक पोलिस निरीक्षक) विरुर स्टेशन, प्रमुख मार्गदर्शक सगिंताताई धोटे (सामाजिक कार्यकर्त्यां), नगराळे सर (तालुका व्यवस्थापक), भडके सर (तालुका व्यवस्थापक), पायल चोपावार (pum acf) दिपक मडावी (सामाजिक कार्यकर्ते), सुमित्रा ताई कुचनकर (सामाजिक कार्यकर्त्यां), पलवि बोबडे, सोनाली दुबे, मयूर मोहुरले भावना मडावी (सी. आर. पि) उपस्थित होते. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक शुभांगी आत्राम (ग्रा. प. सदस्य) अनिता वांढरे (ग्रा. प. स) नंदा मडावी अगनंवाडि सेविका, हेमलता अलोने आशा वर्कर्स उपस्थित होते
तसेच ग्रामसंघाचे पदाधिकारी अर्चना भागेवाड अध्यक्ष, तुळजा शेलुरकर कोषाध्यक्ष, प्रविणा ताडे लिपिका, यानी मोलाचे सहकार्य केले, यावेळी कार्यकारी मंडळाच्या कविता वडसकर, शोभा वडसकर यांचे सहकार्य लाभले. महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने महिलांनी समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या महिलांचे वेश परिधान करून समाजाला ऐक सला दिला त्यात अस्मिता मडावी यांनी राणी दुर्गावति, आरती टेकाम यांनी माता सावित्री फुले, शिवानी कडुकर यांनी राजमाता जिजाऊ साहेब, तर ताराबाई चादेंकर यांनी माता रमाई यांचे वेशभूषा सादर केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महिलांच्या लेझीम नृत्याने करण्यात आले सूत्रसंचालन पल्लवी बोबडे, तर आभार प्रदर्शन सोनाली दुबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी समस्त तुलाना येथील महिला व बचत गटाच्या महिलांनी मेहनत घेतली