उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील सामाजिक कार्यकत्या आणि महाराष्ट्र संदेश न्युजच्या सांगली शहर प्रतिनिधी उषाताई कांबळे यांना नुसताच राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
महाबोधी सदधम्म विपश्यना ट्रस्ट मुडाणा तालुका महागाव जिल्हा यवतमाळच्या वतीने दरवर्षी समाजातील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक, विचारवंत व विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदाच्या ‘राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात उषाताई कांबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र संदेश न्युजच्या सांगली शहर प्रतिनिधी उषाताई कांबळे यांची पुरस्कार साठी निवड झाली असून दिनांक 19 मार्च 2023 रोज रविवार सुमेध बोधी बुद्ध विहार उमरखेड बोरबन येथे समारंभपूर्वक हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
उषाताई कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी निवड झाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.