उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोल्हापूर:- फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक कार्याची दखल घेऊन तामिळनाडू येथील चेन्नई मद्रास विद्यापीठातर्फे डॉक्टरेट डीलीट पदवी मिळालेबद्धल डॉ नितिन वसंत गोंधळे यांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, पट्टणकडोली जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी समितीचे अध्यक्ष सागर पांडुरंग कांबळे, उपाध्यक्ष महेश कुरणे, सेक्रेटरी सचिन चोपडे, खजिनदार कृष्णजीत चोपडे, सदस्य प्रणव कांबळे, रोहित चोपडे,सनी मधाळे, रोहित मधाळे, सनि कांबळे, विश्वजीत कांबळे, आणि पट्टणकडोलीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमर बनगे (सरकार) हे सर्व उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348