✒️मंगेश जगताप मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- ११ मार्च २०२३रोजी इंडियन्स सोशल मुव्हमेंट च्या १६ व्यां वर्धापन दिनानिमित्त पनवेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी सोहळा आयोजित करण्यात आला होता. मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय या अखंड भारताच्या लाख मोलाच्या विचारांच्या शिदोराची लयलूट यावेळी केली गेली. यावेळी लेखक, विचारवंत, संविधान मार्गदर्शक, ISM चे संस्थापक आनंदा होवाळ सर, सविताताई सोनावणे कदम, प्रकाश कदम, दिनेश खोल्लम, वसंत मोहिते, हरीश उच्छील माजी अध्यक्ष इंडियन्स सोशल मुवमेंट, प्रमुख अतिथी म्हणून आयु. शशिकांत दायमा, गोपीनाथ लोखंडे, राजेंद्र मढवी, हरीश उच्छिल, नरेश परदेशी यांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
इंडियन्स सोशल मुव्हमेंट च्या १६ व्यां वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी बद्दल सन्मानपत्र देऊन अनेकांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विशेषत लहान मुलांचे नृत्य नेपथ्य छान आकर्षण होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषालीताई माने व विद्या भगत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत वाघ, कृष्णा वाघमारे, संदेश जाधव, गौतम सवार, प्रकाश कातकरी, संजय आव्हाड, शरद धनराव, अनीताताई सोनवणे यांनी कष्ट घेतले.
त्याचप्रमाणे सविताताई सोनावणे कदम संविधान यांनी संघटनेची स्थापना पासून आतापर्यंत यशस्वी वाटचाल व भूमिका मांडली. तद्वतच लेखक, विचारवंत, संविधान मार्गदर्शक, ISM चे संस्थापक आदरनीय आनंदा होवाळ सर यांनी पुढील काळातील ध्येय धोरणाची आखणी करून वैचारिक मंथन केले. यावेळी प्रकाश कदम यांच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच वक्तागण आयु. दिनेश खोल्लम, आयु वसंत मोहिते आणि हरीश उच्छील माजी अध्यक्ष इंडियन्स सोशल मुवमेंट, यांनी जोरदार भाषण करून वैचारिक आखणी केली.
यावेळी या कार्यक्रमाला मुंबई, नाशिक, नेरळ, रायगड, वर्धा अनेक जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचे आणि प्रकाश कदम मिशन संविधान आणि नरेश परदेशी त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली त्यामुळे संघटनेतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348