संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सामाजिक वनिकरण परिक्षेत्र राजुराचे वनपाल विलास कुंदोजवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरीत सेनेच्या विध्यार्थीसोबत जागतिक वन दिवस कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित विध्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.
दृष्टीआड असलेल्या सृष्टी चे महत्व मानवाला न समजण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल. शुद्ध हवा, पिण्याचे पाणी, आणी इतरही बाबी आपल्याला मिळतात त्या जंगलामुळेच. मात्र चंगळवादि जीवनशैलीसाठी केल्या जाणाऱ्या बेसूमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे 1970 च्या दशकात जाणवू लागले. त्यातून जंगले वाचवीन्याची संकल्पना पुढे आली. यावेळी अनावश्यक जंगलतोड टाळणे, अधिक झाडे लावणे, जंगलापासुन मिळणारी उत्पादने आणी होणारे फायदे, जंगलाना सतत भेट दिल्याने मिळणारी माहिती इत्यादी उपक्रमात आपण सहभागी झाले पाहिजेत.जंगलाबाबत आस्था आणी जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलाबद्दल चिंता वाटत असणाऱ्या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे हा देखील वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय हरीत सेना इको क्लब च्या विध्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. वृक्ष संवर्धन, पर्यावरण संवर्धन चा संकल्प उपस्थितांनी घेतला.