✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक खळबजनक माहिती समोर आली आहे. शहरातील नॅनो पार्क परिसरात असलेल्या एका घरात अवैधरित्या हायप्रोफाईल देहव्यापार सुरू होता. त्यात आलिशान गाडीने ग्राहकांना त्यास्थिकानी आणून त्यांना महिला पुरवल्या जात होत्या. त्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली असता. या अवैध हायप्रोफाईल देहव्यापाराचा स्पर्धाफास करण्यात पोलिसांना यश आले.
शहरात एका ठिकाणी अवैधरित्या अनैतिक देहव्यापार सुरु असुन त्या ठिकाणी एक महिला स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता मुली व महिलां कडुन पैशाचे आमीष दाखवून येणाऱ्या ग्राहकांशी शरिरसंबंध करण्यास प्रवृत्त करुन मुली व महीलांकडुन देहव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती क्राईम इंटेलिजेन्स पथकाला मिळताच हि माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना देऊन त्यांचे आदेशाने पथकासह उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांना माहीती देवून त्यांचं परवानगीने पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांचे मदतीने एक बनावट ग्राहक बनवुन हिंगणघाट शहरातील नॅनो पार्क, शाहालंगडी रोड येथे छापा टाकला असता घरात आरोपी मंगेश दिलीप सुके, उमेश नारायण कोटकर, एक महिला आरोपी सर्व रा. हिंगणघाट हे त्यांचे आर्थिक फायद्या करीता एका महिले कडुन देहव्यापार करवुन घेत असतांना मिळुन आले.