श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- तीन वर्षापासून बंद असलेली पोलीस सबसिडी कॅन्टीन दिनांक 22 मार्च रोजी गुढीपाडवा नववर्षाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या प्रयत्नातून सुरू झाली.
पोलिसांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गरजांसाठी पोलीस सबसिडी कॅन्टीन ही कोरोना काळापासून बंद होती. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने पोलीस अधीक्षक यांना विनंती केली. त्यावर पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी तात्काळ कॅन्टीन सुरू करण्याचे आदेश दिले. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पोलिसांच्या हिताचा निर्णय व त्याचा शुभारंभ करण्यात आला.विशेष म्हणजे या कॅन्टींग शुभारंभ पोलीस अधीक्षकांनी पोलीस पत्नी व कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातून श्रीफळ फोडून केला. या सबसिडी कॅन्टींग सुरू करण्यासाठी विशेष मदत म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करून पोलीस परिवारांना सवलतीच्या दरात दैनंदिन जीवनात लागणारे वस्तू कशा उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा केला.या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक सहपरिवार उपस्थित होते. कोरोना काळाच्या अगोदर पासून ही पोलीस कॅन्टीन बंद होती. पोलीस पाल्यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना सुरू करण्याबाबत विनंती केली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ही कॅन्टीन जिल्ह्यातील पोलीस परिवारांसाठी सुरू झाली. पोलिसांच्या हिताच्या कामात आणखीन एक भर पडली आहे.सर्वांनी या कॅन्टीनचा लाभ घ्यावा.
या कार्यक्रमांमध्ये होम डिवाएसपी शिंदे शहर मधील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशनचे रवी सानप, ग्रामीण पोलीस स्टेशनचे साबळे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे राठोड , एस.पी. पथक प्रमुख विलास हजारे साहेब, पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले, आरसीपी चे इन्चार्ज व कर्मचारी पोलीस परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.