भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड सचिन मोतकूवार आणि शरीफ शेख यांनी आंदोलनात सहभाग.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दिनांक २३/०३/०२३ रोज गुरुवारला मौजा तोडगट्टा ता. एटापल्ली येथे मागील १२ दिवसापासून सुरू असलेल्या दमकोंडवाही बचाव समिती (संयुक्त ग्रामसभा) यांच्या आंदोलनात भारतीय कम्यूनिस्ट पार्टी एटापल्ली तर्फे कॉम्रेड सचिन मोतकुरवार व कॉम्रेड शरीफ शेख यांनी प्रतीकात्मक एकदिवसीय सहभाग दिला व कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी आंदोलनात सहभागी संयुक्त ग्रामसभेच्या नागरिकांना अन्यायविरुद्ध एकत्र होण्याबद्दल अभिनंदन केले आणि खदान सुरू होणे हे आपल्या पर्यावरणासाठी धोकादायक आहे खदान सुरू करण्यासाठी जंगले नष्ट केली जातता त्या भागातील पाण्याचा दुरुपयोग होतो आणि पानी सुद्धा दूषित होते धुळीमुळे विविध आजार परिसरातील लोकाना होतात, ग्रामसभेच्या परवानगीशिवाय शासनाने आणि परिसरातील जनतेशी चर्चा न करता कोणतेही अनावश्यक खदाणी मंजूर करू नये. नागरिकांनी मागणी केलेली रोड बांधकाम करावे खदान सुरू करण्यासाठी रोड बांधकाम करू नये असे प्रतिपादन केले.
दमकोंडवाही परिसरातील नागरिकांना गरजेचे असलेले उत्तम आरोग्य सुविधा २४ तास निवासी डॉक्टर व औषध उपलब्ध असावे, उत्तम शिक्षण निवासी शिक्षक राहून ‘शिकवावे १, २४ तास शुद्ध व मुबलक पिण्याचे पानी शासनाने संपूर्ण लक्ष देऊन वरील सुविधा नागरिकांना देऊन त्याची सेवा करावी. व भारतीय कम्यूनिस्ट एटापल्ली चा आंदोलनाला समर्थन आहे असे आपल्या मारदर्शनपर भाषणात सांगितले.