पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- 22 वर्षीय तरूणीकडे शरीर सुखाची मागणी केल्यानंतर त्यास तिने नकार दिल्याने नराधमाने तिचे हात-पाय कपडयाने बांधुन गांजा ओढुन त्याचा धुर तिच्या नाका-तोंडात सोडुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना दि. 17 मार्च रोजी घडली असून याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
श्रवण राजेंद्र अंकुशे (रा. उंड्री, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी 22 वर्षाच्या पिडीत तरूणीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आणि पिडीत तरूणी यांच्या आरोपीचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तसेच पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन दि. 17 मार्च रोजी भांडण झाले. आरोपीने घराचा दरवाजा लावुन पिडीत तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यास तरूणीने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आरोपी श्रवण अंकुशे याने पिडीत तरूणीचे हात कपडयाने बांधून गांजा ओढुन त्याचा धूर तिच्या नाका-तोंडात सोडला. तिच्या डोक्यात आणि पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गांजाचा धूर नाकात गेल्याने पिडीत तरूणीला गुंगी आली. त्यानंतर आरोपी अंकशेने तिच्या इच्छेविरूध्द बलात्कार केला.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तोरगल करीत आहेत.