✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.२४:- स्थानिक रा. सु. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आयोजित महारोजगार मेळाव्यात इंडोरामा सिंथेटिक प्रा.लि. बुटीबोरी, प्लॉस्टो पाईप्स, हिंगणा, गिमाटेक्स प्रा.लि. हिंगणघाट, जायका मोटर्स हिंगणा, महिंद्रा अँड महिंद्रा हिंगणा, अशोक ले-लँड, सुझकी मोटर्स गुजरात, प्यजिओ वेहीकल्स, बारामती यासारख्या नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहुन यात २७ नामांकित कंपन्या त्यांच्याकडे रिक्त असलेली पदे भरण्याकरीता मुलाखती घेणार आहे. सहभागी होणार असून एकूण २७३६ उमेदवारांना याचा लाभ होणार आहे. सदर मेळाव्याचे आयोजन दि. २९.०३.२०२३ ला रा. सु. बिडकर महाविद्यालयात करण्यात आले असून बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान मा. राहुल कर्डीले, जिल्हाधिकारी वर्धा, डॉ. उषाकिरण थुटे, अध्यक्षा ग्रामीण विकास संस्था, समीर कुणावार आमदार हिंगणघाट- समुद्रपूर- सिंदी क्षेत्र, डॉ. बालाजी राजुरकर, प्राचार्य रा. सु. बिडकर महाविद्यालय यांनी केले आहे.
इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आपल्या शैक्षणिक कागदपत्राच्या झेरॉक्स व पासपोर्ट फोटो सोबत आणावे. तसेच ऑनलाईन सहभाग नोंदविण्यासाठी उमेदवारांनी www.rojgar.maha swayam.gov.in या वेब पोर्टलवर job seekers म्हणून आपले युजरनेम आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिन करावे आणि पात्रतेनुसार कंपनी वर apply करावे.