राजेंद्र झाडें, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
गोंडपिपरी:- तालुक्यातील अवकाळी गारपीटसह मूसळधार पावसामूळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी येथील तहसीलदार मेश्राम यांचाकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
गोंडपिपरी तालुक्यात 19 मार्च ला गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावून शेतकर्यांचे अतोनात नुकसान केले आहे. यानंतरही सतत येणाऱ्या पावसाने हरभरा, गहू, मका, ज्वारी, भाजी पाला या पिकांना उद्ध्वस्त केला. आता शेतकरी संकटात आहे. तोंडाजवळ आलेले घास या अवकाळी पावसामुळे गेला. म्हणून गोंडपिपरी तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांकडून तहसीलदार के डी मेश्राम साहेब यांना लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून भरपाई मिळवून देण्यात यावे, यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळेस तिथे मा जि.प.सदस्य अमर बोडलावार, प्रशांत येल्लेवार,सूरेंद्र घाबर्डे, वैभव बोनगिरवार, सुरेश दूमनवार,आणि भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.