अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- स्थानिक वार्ड क्रं १८ मधील कमला नगर येथील मुख्य रस्त्यावरील काटेरी झाड खुप मोठ्या प्रमाणात वाढले होते लोकांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता. म्हणुन सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना आपले सरकार पोर्टल तसेच इमेल द्वारा सदर काटेरी झाड तोडण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली होती.
या परिसरातील काटेरी झाड तोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी दिलेल्या निवेदनातून मागणीची महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आज अग्निशमन दलाच्या कर्मचारी यांनी हे काटेरी झाड तोडले यामुळे सदर रस्ता नागरिकांना ये जा करण्यासाठी मोकळा झाला असून उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून नागरिकांनी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले.