पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020795626)
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची कामगिरी
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :– मा. वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे दि. २१/०३ /२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड पोलीस उप निरिक्षक गिरिश चामले व पोना / १४५६ भोसुरे, पोशि/२८८३ काळे, पोशि/ १९४० हनमंते, पोशि/ २००१ नांगरे असे अवैद्य धंद्यावरिल कारवाई अनुषंगाने चाकण पोलीस ठाण्यात पेट्रोलिंग करीत असताना पोशि २८८३ काळे यांना त्यांचे बातमीदार कडून माहिती मिळाल्याने नमूद पथकाने चाकण हद्दीत आळंदी फाटा येथे फॅशन सलुन समोर इसम नामे १) संदिप उमा शंकर द्विवेदी वय २७ वर्षे. रा. कडाचीवाडी ता.खेड जि.पुणे २) मोहन रामनरेश गुप्ता वय २१ वर्षे, रा. बलगा वरती मैदनगरवाडी, चाकण ता.खेड जि.पुणे ३) लवकुश कमलेश लाक्षकार वय २५ वर्षे, रा. आळंदी फाटा, ता.खेड जि.पुणे ४) सुमित विनोदकुमार इटोदिया वय २६ वर्षे, रा. रा. कडाचीवाडी ता.खेड जि.पुणे ५) संतोष उमाशंकर व्दिवेदी वय २८ वर्षे, रा. रा.कडाचीवाडी ता.खेड जि.पुणे यांनी कल्लु गुप्ता रा. चाकण ता.खेड जि.पुणे याचे सांगणेवरून संगनमत करुन पोत्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व तंबाखु विक्रीकरीता साठवणुक करुन स्वीप्ट व मोटर सायकलवरती भरुन विक्री करीता घेवून जात असताना मिळून आले त्यांचेकडे शासनाने प्रतिबंधीत केलेला एकूण २,९४,६१०/- रु किं चा गुटखा व तंबाखु मुद्देमाल व स्वीप्ट कार एक मोटर सायकल असा एकुण ११.५४,६१० रुपयेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच कल्लु गुप्ता याचा शोध घेतला असता मिळून आला नाही सदर आरोपीचे विरुद्ध चाकण पोलीस ठाणे गु.र.नं. ३११ / २०२३ मा.दं.वि. कलम ३२८, २७२, २७३, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री मनोज लोहीया, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार सचिन मोरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, शशिकांत नांगरे, समीर काळे, रामदास मेरगळ, महेश भालचिम, निखिल फापाळे तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.