मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील पोलिस स्टेशनमध्ये मध्ये कार्यरत तत्कालीन पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांनी न्याय मागण्यासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार केला. त्यामुळे संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी तरुणीने तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आरोपी पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांनी वरीष्ठ न्यायालयात जमानतसाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे संपत चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या आहे.
ज्या ठाणेदाराकडे न्याय मागायला जातात, त्यानेच अन्यायाची परिसीमा गाठण्याची घटना हिंगणघाट पोलीस ठाण्यात घडली होती. स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात संपत चव्हाण हा पोलीस निरीक्षक सापडलेला होता. त्यात आता न्यायालयाने त्यांच्या जमातीचा अर्ज रद्द केला असल्याने आरोपी संपत चव्हाण यांना न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे.
काय आहे प्रकरण…
हिंगणघाट शहरातील चोवीस वर्षीय तरुणीने तत्कालीन पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या विरोधात वर्धा पोलीस अधीक्षक यांना तक्रार दिली होती. पिढीत तरुणीने आपल्या पाच पानी तक्रारीत नमूद केल्यानुसार, एक तक्रार करण्यासाठी ती ५ ऑगस्ट २०२१ ला हिंगणघाट ठाण्यात गेली होती. त्यावेळी सेवेत असणाऱ्या ठाणेदार चव्हाण यांनी तू माझ्याशी मैत्री केली तर तुझे प्रकरण मार्गी लावतो, असे म्हणत ओळख वाढविली. पुढे युवती घरी एकटीच असल्याची संधी साधून तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले. या खाकी वर्दीतील बहाद्दराने एवढ्यातच न थांबता एक व्हिडिओ पण तयार केल्याचे युवतीने नमूद करीत त्या आधारे सतत ब्लॅकमेल केले व वारंवार अत्याचार केल्याची तक्रार दिली होती.