प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वना नदी संवर्धन समिती, तालुका विधी सेवा समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित “चला जाणून घेऊया नदीला” या उपक्रमा अंतर्गत दिनांक २३ मार्च रोज गुरुवारला वना नदीचे यात्रा महोत्सव तिरांवर जलपुजन, आरती तथा जल हैं तो कल हैं जयघोष करुन जलसंवर्धन कार्याची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समिती वरोराचे सचिव डाँ. विकास आमटे हे होते तर प्रमुख अतिथि म्हणून जिल्हा अतिरिक्त सत्र. न्यायाधीश श्री. आर.आर.मेंढे, न्यायाधीश जे.वाय. घुले, माने, देशमुख, पवार, देशपांडे, बोर्डे, अधिवक्ता संघाचे अध्यक्ष आर.आर. बोंडे, पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर आदी मान्यवर मंचसिन होते.
यावेळी वणा नदीचे जलपुजन करुन आरती राजेश महाराज शेन्डे, वारकरी पंथाचे मोहन महाराज गंडाईत यांचे हस्ते पूजन आरती करुन नारळ अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिला अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विद्याधर काकतकर यांनी केले. यावेळी न्यायाधीश आर.आर. मेंढे यांनी जलसंवर्धन व नदीप्रवाह असणाऱ्या शहराला कसे सुंदरता प्रदान करता येते याचे दाखले देत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. तर अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना समाजसेवी डाँ. विकास आमटे यांनी आजपासून सत्तर वर्षापूर्वी बाबा आमटे यांनी पाण्याचे नियोजन आनंदवनात कशा पध्दतीने केल्याचे तसेच ह्या समाजातून फेकलेल्या माणसांचे आनंदवनात आनंदित जीवन जगण्याचा मंत्र दिला तेव्हा जल, जमीन, जंगल हे आपले पर्यावरणीय समतोल राखण्याचे सुत्र असल्याचे प्रतिपादन केले. तेव्हा वना नदीचे महत्व आपण शहर वासियांनी समजवून घेतले पाहिजे असे विचार डाँ. आमटे यांनी मांडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डाँ. बी.आर.आंबेडकर विद्यालयाचे सचिव अनिल जवादे यांनी आपले महत्वपूर्ण विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन न्यायाधीश पवार यांनी केले. तर आभार प्रर्दशन वणा संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष रुपेश लाजुरकर यांनी मानले, यावेळी जल प्रतिज्ञा भारतीय युवा संस्कार परीषदेचे प्रदीपकुमार नागपुरकर यांनी वाचन करुन सर्वाना दिली. यावेळी डाँ. बी.आर.आंबेडकर विद्यालय, रोटरी क्लँब, नारायण सेवा समिती, वारकरी भजन मंडळ, आदींचे सहकार्य लाभले.