सागर शिंदे, वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- मालेगांव येथील रहिवासी तसेच रामराम सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. मयुरी अवताडे उत्कर्ष विद्यार्थीनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रामराम सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये विविध गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत शिबीरे घेतली जातात. या शिबिरामध्ये तसेच महाविद्यालयीन उपक्रमामध्ये विद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु. मयुरी अवताडे हिने सलग पाच वर्ष केलेले कौतुकास्पद कार्य आणि योगदानाची दखल घेत अमरावती शिक्षण मतदार संघाचे आमदार अँड. किरण सरनाईक यांच्या हस्ते तीला उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यासाठी मयुरीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. भारती देशमुख यांच्यासह प्राध्यापक वृंदाचे मार्गदर्शन मिळाले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348