46 हजार कोटींचा मालक होता. शेअर मार्केट कोळून प्यालेला माणूस.
1 :- मी माशासारखी दारू पितो म्हणायचा. सिगारेटला तर मोजदाद नव्हती. मधुमेह होऊन पाय सुजला आणि खुर्चीवरच आयुष्य जाऊ लागलं तेंव्हा म्हणाला, आयुष्याला शिस्त हवी. व्यायाम करायला हवा होता.
2 :-
1985 ला 5 हजार रुपयांची पहिली गुंतवणूक केली होती.2022 ला एकूण मालमत्ता 46 हजार कोटीवर गेली. याबद्दल कसं वाटतंय म्हणून विचारल्यावर म्हणाला, “कोण मोजत बसलंय संपत्ती? कुणाला दाखवायची आहे बॅलन्स शीट? माझी एक पार्टनर आहे पण तिलाही त्यात इंटरेस्ट नाही. आणि सध्याच्या तुलनेत 15-20 % संपत्ती असती तरी तीच गाडी, तेच घर असतं, तीच व्हिस्की पीत राहिलो असतो!”
3 :-
राकेश झुणझूनवाला रिस्क घ्यायला कचरत नव्हता. रिटर्न मिळण्याची एकदा खात्री वाटली की बायकोच्या बांगड्या विकून गुंतवणूक करेन म्हणायचा.
4 :-
46 हजार कोटींचा मालक होता, पण पंतप्रधान मोदींना भेटायला गेला तेंव्हा शर्ट चुरगाळलेला होता. विचारल्यावर म्हणाला,600 रुपये देऊन इस्त्री केली, तरी तो चुरगाळला, मी काय करू?
निर्मला सीतारामणला भेटला तेंव्हा पायात फ्लोटर होती.
5 :-
झुणझूनवाला बोलायला बेधडक होता. मला मार्केट आणि स्त्रियांमध्ये जास्त रस आहे म्हणायचा.
माझी पोरं 25 वर्षांची झालेली बघायची आहेत म्हणायचा, पण 2009 ला जन्मलेली जुळी पोरं अजून 14 च वर्षांची आहेत. मुलगी मात्र 18 वर्षांची आहे. पत्नी रेखा सोबत लग्न 1987 ला झाले, पण मुलं 17 वर्षांनी झाली.
ययातिसारखे सारे भोगून झाल्यावर झुणझूनवाला “आयुष्याला शिस्त हवी होती” म्हणत राहिला.
आपल्यासाठी हा एक मेसेजच.!!!
मुंबई प्रतिनिधी रूपसेन उमराणी