अक्षय जाधव सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सातारा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये एका तरुणावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हे प्रकरण दडपण्यासाठी पीडितेलाच धमकी दिल्याचा आरोप झाल्याने संशयित मुलाच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने संबंधित संशयित मुलाला अटक केली. शेखर महेश ननावरे वय 24 वर्ष, महेश ननावरे रा. वर्ये, ता. सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित युवती अल्पवयीन ही 17 वर्षांची असून, ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. संशयित शेखर ननावरे याच्यासोबत तिची ओळख झाल्यानंतर त्याने विविध ठिकाणी नेऊन तिच्यासोबत गैरकृत्य केले. या प्रकारचे फोटो, व्हिडीओ त्याने तयार केले. वारंवार भेटण्यासाठी पीडितेवर दबाव आणू लागला तर संशयिताच्या वडिलांनी तुझी आई पोलिसांकडे गेली तर तुझे व कुटुंबाचे आयुष्य बरबाद होईल. व्हिडीओमुळे तुम्ही अडचणीत याल. मी तुम्हाला बरबाद करेन, अशी धमकी दिली. या प्रकाराची माहिती पीडित मुलीने तिच्या आईला दिल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक मोटे या अधिक तपास करीत आहेत.