✒️संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथे विविध घटनेत दोन महिलांची हत्या करण्यात आली त्यात एक गरोदर मशिलाचा समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण नागपुर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिली घटना हिंगणा हद्दीत तर दुसरी हुडकेश्वर मधून समोर आली आहे.
पहिल्या घटनेतील पायल पिल्लेवार वय 30 वर्ष राह. बाबुलखेडा हिचे अमरावती येथील आकाश गजभिये याच्याशी लग्न झाले होते. मात्र, पायलचे राजू शंभूजी पाणतावणे वय 40 वर्ष, राह. घोगली याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे ती पतीला सोडून वर्षभरापूर्वी माहेरी आली. राजू पाणतावणे याच्या घरी राहायला गेली. राजूकडून ती पाच महिन्यांची गर्भवती होती. राजूला दारुचे व्यसन होते. त्यावरुन त्याचे पायलशी वाद होत होते. शनिवारी दुपारी राजूने उशिने पायलचे तोंड दाबले. त्यात गुदमरून पायलचा मृत्यू झाला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी राजूला अटक केली.
दुसऱ्या घटनेत, सुषमा काळबांडे वय 35 वर्ष, राह. दिघोरी ही स्वयंपाकाच्या कामाला जात होती तर तिचा पती भाजीविक्रेता आहे. तिचे आरोपी दीपक इंगळे या युवकाशी अनैतिक संबंध होते. या दरम्यान सुषमाने आणखी एका युवकाशी प्रेमसंबंध जुळवले. यामुळे प्रियकर दीपक याचा जळफळाट होत होता. गुरुवारी दीपकने सुषमाला फिरायला जाण्यासाठी गळ घातली. दीपक आणि सुषमा दोघेही दुचाकीने हिंगण्याजवळील रुई पांझरा परिसरात गेले. तेथे दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सुषमाला त्याने अन्य युवकाशी असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. तिने नकार देताच दीपकने तिच्या डोक्यावर मोठा दगड घालून हत्या केली.