सौ. हनीशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दि.२४ मार्च रोज शुक्रवारला भारतीय बोैद्ध महासभा, चंद्रपूर जिल्हा आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा राजूरा च्या अंतर्गत भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखा गोवरीच्या वतीने दि २४ मार्च ते ०२ एप्रिल २०२३ पर्यंत सुरू असलेले “दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन तक्षशिला बुद्ध विहार गोवरी तालुका राजुरा येथे करण्यात आले.
सुरुवातीला बुद्ध वंदना घेण्यात आली. शिबीराचे उदघाटक आयु.नी. गायत्रीताई रामटेके केंद्रीय शिक्षिका व अध्यक्षा भा.बो.महासभा बल्लारपूर चंद्रपूर जिल्हा हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मुजी नगराळे राजूरा शाखा प्रमुख मार्गदर्शक अशोक घोटेकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष व शिबिराचे मार्गदर्शक कविताताई अलोने केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर होते. प्रमुख अतिथी म्हणून किशोर तेलतुंबडे शहर सरचिटनीस, गौतम चौरे तालुका सरचिटणीस, के. एल.गजभिये, अलोने सर, प्रा. दिनेश घागरगुंडे उपाध्यक्ष, इजी. राहुल भगत ग्राम अध्यक्ष गोवरी, सिद्धार्थ कास्वटे सभासद ग्राम पंचायत, अशोक दुबे ग्राम अध्यक्ष रामपूर, मेघा बोरकर शहर अध्यक्षा, किरण खैरे शहर कोषाध्यक्ष, सुजाता नळे शहर सरचिटणीस, वंदना देवगडे उपाध्यक्षा, प्रगती मून, पौर्णिमा ब्राम्हणे, प्रणाली ताकसांडे, शकुंतला ठमके, लताताई नगराळे, अनिता कास्वटे यांचे स्वागत करण्यात आले आणि सर्वांनी शिबीरास मार्गदर्शन केले.
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा च्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विज्ञानवादी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केल्या जातो. या करिता 24 प्रकारचे शिबिरे घेऊन बौद्ध धम्माच्या संस्कारचे प्रशिक्षण दिले जाते. महिला करीत धम्म उपसिका प्रशिक्षण शिबीर फार महत्वाचे गोवारी या गावी शिबिरास प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात आला. या शिबिरात महिला व पुरुषांची उल्लेखनिय उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन इजि.राहुल भगत आणि आभार प्रदर्शन गौतम चौरे यांनी केले. शेवटी भारतीय बोैद्ध महासभेच्या नियमानुसार सरणत्त्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
वरील शिबिरे यशस्वी करण्याकरिता संबुद्ध पंचशील युवा मंडळ, रमाई महिला मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, भारतीय बौद्ध महशाभा ग्राम शाखा गोवारी तालुका राजुरा सर्वच पदाधिकाऱ्री अथक परिश्रम घेत आहेत. पुन्हा असेच शिबीरे राजुरा तालुक्यात राबविण्यात येतील असे आश्वासन धर्मु नगराळे तालुका अध्यक्ष यांनी सांगितले.नंतर शेवटी भारतीय बोैद्ध महासभेच्या नियमानुसार सरणत्त्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.