✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुका लोकसंख्येचा दुष्टिने मोठ्या असून या तालुक्यातील परिसरात आरोग्य सेवेच्या दृष्टीने सुसज्ज असे कोणतेही वैद्यकिय महाविद्यालय नाही. त्यामुळे वैदकीय उपचारासाठी इतर ठिकाणी जाऊन आपला उपचार करावा लागत आहे. अशा वेळी आपत्कालीन स्थितीत रुग्णाला परिपूर्ण उपचार न मिळाल्यामुळे जीवघेणी परिस्थिती उद्भवत असते. वेळेवर चांगल्या प्रकारचे वैदकीय उपचार न मिळाल्याने अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे हिंगणघाट तालुक्यात सुसज्ज असे वैदकिय शासकीय रुग्णालय निर्माण करण्यात यावे ही मागणी घेऊन आज सकाळी 11वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून तहसील कार्यालया प्रयत्न महारॅलीचे आयोजित करण्यात आले होते.
शासनाने नविन शासकिय वैदाकिय महाविद्यालय तयार करायाची घोषणा केलेली असून त्यात वर्धा जिल्हयाचा समावेश करण्यात आलेला आहे ही आनंदाची बाब आहे. वर्धा जिल्हयात जिल्हा रुग्णालयासह खाजगी क्षेत्रातील सेवाग्राम व सावंगी (मेघे) येथे अवघ्या 7 किमी. अंतराच्या परिसरात दोन वैद्यकिय महाविद्यालय आहे. परंतु हिंगणघाट हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असुन सतत अपघात घडत असते. गंभीर रुग्णांना
सेवाग्राम अथवा सावंगी (मेघे) येथे नेताना कित्येक रुग्णास प्राणास मुकावे लागले आहे. काहीना नागपूरला सुद्धा हलवावे लागते. यात प्राणहानी सोबत आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो.
हिंगणघाट आरोग्यसेवेच्या दृष्टीने मागासलेले शहर असल्याने कित्येक गर्भवती माता व नवजात
शिशुंना नागपुरला पाठवावे लागते. वर्धा येथे उपचाराकरिता आलेल्या गर्भवती मातांपेक्षा हिंगणघाटच्या रुगांची संख्या अधिक असल्याचे एका सर्वेक्षणाअंती दिसुन आलेले आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्र यवतमाळ, चंद्रपूर व नागपूर जिल्हातील ग्रामीण भागाशी जुळलेला असुन
येथील अनेक रुग्ण हिंगणघाट या मध्यवर्ती ठिकाणी येऊन उपचार घेऊन सायंकाळी घरी परत जातात. शिवाय तेलंगना राज्याची सीमा लागुण असल्याने व रेल्वे मार्गने जोडले असल्याने परराज्यातील अनेक रुग्ण)उपचाराकरिता हिंगणघाट शहरात येत असते.
हिंगणघाट शहरात शासकिय वैद्यकिय महाविद्यालय झाल्यास परिसरातील नागरिकांना अल्प दरात उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळू शकते. अशी येथील सुजाण नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांची मागणी करण्यात आली आहे. या करिता शासनाने ठरविलेले वर्धा जिल्ह्यातील प्रस्तावित शासकिय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट येथे देण्या बाबतची शिफारस करावी अशी विनंती करण्यात आली आहे.