उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल येथील आदिवासी फासेपारधी समाजाच्या कुटुंबिय राहत असलेल्या वनविभागाच्या जागेवरील झोपड्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती किंवा पूर्व सूचना न देता पोलिस बंदोबस्तात झोपड्या जीसीपी मशीन द्वारे जमिन दोस्त करून अनेक कुटुंबाचे संसार उद्धवस्त केला आहे
यावेळी तिथे उपस्थित महिला आणि पुरुष यांना धक्काबुक्की करून एक प्रकारचा अमानवी अत्याचार केला असून ही बाब गंभीर आहे त्यांचे जप्त केलेले प्रापंचिक साहित्य ताबडतोब परत करावे, त्याच्या झोपड्यांचे ताबडतोब पुनर्वसन करून आहे त्याठिकाणी पक्की घरे बांधून द्यावे, त्यांच्या जागेचा ८ अ चा उतारा नोंद करण्यात यावा अन्यथा भारतीय ब्ल्यू पँथर पॅथर स्टाईलने तिव्र आंदोलन करेल असा इशारा भारतीय ब्ल्यू पँथर चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गोंधळे व कार्याध्यक्ष धनंजय खांडेकर यांनी दिला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात अन्यायग्रस्त नागरिक उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348