श्याम भूतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- शहरातील बार्शी नाका परिसरात चक्क जमादाराच्या बीट अंमलदार यांच्या आशीर्वादाने अवैद्य धंदे जोरात सुरू असून यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने बीट अंमलदार यांच्या कडे लक्ष देऊन नियंत्रण आणावे असे मागणी जनतेतून होत आहे.
बार्शी नाका परिसरात सर्रास अवैध धंदे सुरू असून दारू विक्री, पत्ते क्लब, मटका, सिंधी विक्री असे प्रकार चालू असून कमी वयातील मुलांनाही अनेक व्यसन लागली आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अवैध धंद्यांना बीट अंमलदार यांच्या आशीर्वाद देत असल्याने सामान्य नागरिक झाला असून या धंद्यांना घालून संबंधित बीट अंमलदार या कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्वरित या परिसरातील अवैध धंदे बंद करावा अशी मागणी नागरिकांनी जोर धरू लागली आहे.